तिची वाट पाहताना
तिला एकवेळा पाहण्यासाठी
मी रोज तिची वाट पाहतो
माझे सगळे कामे सोडुन
तिच्या वेळेवर जातो
ती वेळेवर
कधी येत नाही
तीची वाट बघत
मी कधी थकत नाही
कधी कधी ती
वेळेच्या आधी निघुन जाते
तो दिवस माझा ती आता येईल
याच विचारात निघुन जाते
कधी कधी ती
येतच नाही
तो दिवस माझा
चांगला जातच नाही
ती दिसली नाही तर
मी उगवत सुध्दा नाही
ती दिसली नाही तर
मला करमत सुध्दा नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला