महाराष्ट्र आहे आमचा अभिमान
महाराष्ट्र आमचा जीव की प्राण
महाराष्ट्राचे आहोत आम्ही बेरोजगार
परप्रांतीयाना दिला आम्ही आधी रोजगार
महाराष्ट्र येऊन तुम्ही कमावता पैसे
महाराष्ट्रच करतो तुमचे नाव मोठे
महाराष्ट्र येऊन तुम्ही शिकत नाही मराठी भाषा
दिल्लीचा तख राखतो महाराष्ट्र माझा
जरी असेल तुमचे किती मोठे पद
महाराष्ट्राच्या विरोधात नाही काढायचा अपशब्द
झुकणार नाही महाराष्ट्र कधी दिल्ली समोर
छत्रपती आदर्श आहे डोळ्यासमोर
कितीही पाडा तुम्ही महाराष्ट्रात फूट
महाराष्ट्र आमचा आहे एकजूट
असेल किती मोठे योद्धे तुम्ही
मराठे आम्ही नाही कमी
महाराष्ट्र आहे आमची शान
महाराष्ट्र आमचा जीव की प्राण
आता तरी जागी होईल का जनता
भसवल आम्हाला मग म्हणता
बुध्दी आहे तुम्हाला करा त्याचा वापर
नका फोडू कधी दुसर्या खापर
महाराष्ट्र आहे आमची शान
महाराष्ट्र आमचा जीव की प्राण
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला