चिमण्याचा होता किलबिलाट
सुर्य हळूच वर टोकावतो
हिरव्यागार सृष्टी चे दर्शन करून
सुर्य रोज नतमस्तक होतो
पक्षी रोज आकाशात
उंच उंच भरारी घेतात
कधी झाडावर कधी विहीरीत
कधी इमारतीच्या खिडकीवर घरटी घालतात
शहरी करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात झाडे तोंडली जातात
पाऊस येत नाही
म्हणुन मग ओरडतात
टु बीएचके थ्री बीएचके
फ्लॅट सरास विकली जातात
झाडावरचे पक्षी
बेघर होतात
तहानलेला बिबट्या शहराकडे येतो
पाणी पिण्यासाठी
वनविभाग, पोलीस, गावकरी
एकत्र जमतात त्याला ठार मारण्यासाठी
दोन कोटी पाच कोटी
वृक्षलागवडीची मोहीम राबविल्या जाते
प्रत्यक्षात काहीच नाही
कागदावर आणि जाहिरातीत दाखविल्या जाते
आता निसर्ग मायेला वाचण्याची
शेवटची आहे संधी
प्रत्येकाला मनापासुन काम करावे लागेल
विश्व संपण्या आधी
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment