Wednesday, 8 November 2017

जीवन हे सुंदर नसत

जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत
जीवनात आपण
चालतो,धावतो,पळतो,
सावरतो पुन्हा धावतो
जीवन हे भीषण असत

जीवनात आपल्याला जे हव
ते कधी मिळतच नाही
आपल्याला जे सांगायचे
ते इतरांना कधी कळतच नाही
जीवन हे भीषण असत

जीवनात होतो राडा
हलतो पाळणा
पुन्हा येतो दुःखाचा फरून नाला
जीवन ये भीषण हे साला

आई मंगळसूत्र गहाण ठेवून
इस्पितळात मुलाचा इलाज करते
नवरा बायकोला मारून
त्या पैशांत
दारू पिऊन मज्जा करते
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत

सत्तर वर्षाचा म्हातारा
सायकल चालवुन घर चालवतो
घरातील तरूण मुलगा
गाडीवर पोरी फिरवतो
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत

बाप गेल्यावर
आई वृध्दाश्रमात राहते
पोरगा सुनेला घेऊन
फाॅरेन टुर काढते
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत

✍________सागर लाहोळकार
                      ८९७५१३९६०४
                           अकोला

No comments:

Post a Comment