ज्यांना इतिहास माहित नाही
त्यांनी बोलुच नये
चुकीचा इतिहास
पसरू नये
आम्हाला गर्व आहे
आमच्या देशावर
जेथे सुखाने नांदतात सर्व जाती,धर्म
तेही बिना कुठल्या अटीवर
गांधी आणि नेहरू डावपेचांनी
राजकारण जिंकले
पण खऱ्या अर्थाने
सुभाष, लोकमान्य, वीर सावरकर अमर झाले
इतिहास हा चुकीचा,
तोडुन मोडून सांगता येतो
पण खरा इतिहास हा कोणालाच
बदलता येत नसतो
इथला प्रत्येक घटक
साक्ष देतो इतिहासाची
विसरून कस चालणार
गाथा शुरवीराची
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला