Tuesday, 3 March 2020

स्त्रीभ्रूणहत्या

स्त्रीभ्रूणहत्या 
प्रत्येकाला हवी बायको
मग मुलगी का नको
जीवन हव तुम्हाला अन
म्हणता श्वास नको 

माणसाला नाही का  
कायद्याची भिती 
गर्भपात करतात तुम्ही 
थोड्याशा पैशांसाठी 

जन्मा आधीच 
का मारता तीला 
म्हणे... आम्हाला हवा 
वंशाचा दिवा 

मग मुलगी हवी होती 
अस म्हणत वृध्दाश्रमात रडता 
पापाच प्रायश्चित्त म्हणुन 
जीवन जगता 

घेऊ द्या दिला मोकळा श्वास 
घेऊ द्या तिला उंच उंच भरारी 
कारणआपल्या देशाच भविष्य 
आहे तिच्या हाथी 
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

No comments:

Post a Comment