ऑनलाईन शिक्षणाची
घोषणा झाली
माया बापानं
धास्तीच खाली
कसा तरी लाॅकडाऊन मध्ये
तग धरून होता
आज माया बाप
रडत होता
त्यात बोगस बियाण
पडल उरावर
नेते लोक पायाले आले
'बा' गळभास लावल्यावर
हाच का तो कृषिप्रधान देश
जो सांगतो आपुन
जिथ बळीराजाच ठेवला
आपुन फासावर लटकून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment