Sagar Laholkar
Saturday, 25 December 2021
प्रेमात
प्रेमात
तुझ्या प्रेमात पडून
मन झाले बेजार
तुझ्या वाटेवर येण्यासाठी
पावले झाली लाचार
आता फक्त तुझा होकारच
देईल मनाला आधार
नाहीतर तुझ्या आठवणीच
करतील माझा सांभाळ
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Wednesday, 15 December 2021
तू
तू
जितकी टाळशील
तितकी पेटवशील
मनात खोलवर
कायम तूच राहशील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 19 November 2021
बळीराजा
बळीराजा
छप्पन इंचाची छाती
फोडून काढली शेतकऱ्यांने
बळीराजाचा नाद करायचा नाही
लक्षात ठेवाव चहावाल्याने
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 31 August 2021
हायकू - माणूस
माणूस
मी पणा सोडा
एकमेकांना जोडा
तोच माणूस
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 3 August 2021
हायकू - मैत्री
मैत्री
मैत्री असावी
दुर्योधन कर्णाची
खऱ्या प्रेमाची
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Wednesday, 28 July 2021
खर प्रेम
शब्दाविना जे कळत
ते खर प्रेम
मागितल्याशिवाय जे मिळत
ते खर प्रेम
धाग्याविना जे जूळत
ते खर प्रेम
स्पर्शावाचून जे फूलत
ते खर प्रेम
आणि
तुझ्या नाही जे माझ्या मनात
ते खर प्रेम
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पाऊस
बरसणारा पाऊस
तुझी आठवण घेऊन येतो
भिजण्यासाठी मी
तुझ्यासाठी आतूर होतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 26 July 2021
मनात
मनात
असेल तुझ्या मनात
तर एकदा वळून बघशील
नाहीतर पुन्हा तू मला
टाळून जाशील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 23 July 2021
हायकू - रमणे
हायकू - रमणे
मी वाटेवर
रमतो क्षणभर
तुझ्या प्रेमात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 19 July 2021
हायकू - यश
मिळेल यश
मन असावे साफ
तरच लाभ
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
टाळणे
टाळणे
नाही कळणार तूला
माझ्या मनातले बोल
जितकी टाळशील तू मला
तितकीच काळजात घुसशील खोल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
हायकू - अच्छे दिन
अच्छे दिन
खूप ऐकले
अच्छे दिन पाहिले
अंधभक्तानी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Sunday, 18 July 2021
हायकू - जन्म
जन्म
नाही मिळत
जन्म पुन्हा मानवी
का कुरापती
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रतीक्षा
प्रतीक्षा
आता मनावर ठेवला आहे ताबा
पण या प्रेमाची खाज काही सुटत नाही
या जन्मी तर वाटत मला
तुझ्याशिवाय जगण शक्य नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 10 July 2021
हायकू - जन्म
नाही मिळत
जन्म पुन्हा मानवी
का कुरापती
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
हायकू - निसर्ग
पर्वत रांगा
शोभा हिरवळीने
प्रेम नव्याने
वर्णन नको
स्वतः अनुभवावे
जग पाहावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 1 July 2021
अच्छे दिन
जराशी लाज बाळग
निवडून कशासाठी दिले
अच्छे दिन येतात म्हणून
पण तू तर जनतेलाच फसवले
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 28 June 2021
माझा देश
महागाई वर
कोणताही मंत्री बोलत नाही
जनतेला लुबाडतांना
काहीच कस वाटत नाही
आमदार खासदाराचे पगार
कमी होत नाही
देश लुटताना
थोडीशी लाज वाटत नाही
उपाशी जनता मरते
भडवा मन की बात सांगतो
अच्छे दिन येतात
अजून ही स्वप्नच दाखवतो
जनतेचा आक्रोश पाहू नका
रस्ता कमी पडेल धावण्यासाठी
सगळ्या नेत्यांना ठेचून मारले पाहिजे
आपला देश वाचवण्यासाठी
तेव्हा खऱ्या अर्थाने
देशात लोकशाही येईल
तेव्हा माझा देश
प्रजासत्ताक होईल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 26 June 2021
बोल
माझ्या मनातले बोल
कधी कळतील तुला
बरसणाऱ्या पावसाने बघ
कशी साथ दिली मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 24 June 2021
मन
मन
मनासारखे घडण्यासाठी
मन चांगले पाहिजे
आपण किती मने जपली
आधी याचा विचार केला पाहिजे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 21 June 2021
घाव
बरसणार्या पावसाने
थोडे थांबून घ्यावे
तीने दिलेले घाव
जरा मोजून घ्यावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 18 June 2021
तू
तू
तू दिलेल्या वेदना
रोज चाळतो मी
तू दिसल्यावर सखे
अजून भाळतो मी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 10 June 2021
दगा
दगा
तुझ्या वाटा ओल्या झाल्या
माझ्या अश्रूंनी
दिले वचने खोटे झाले
तुझ्या कृपेनी
समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 29 April 2021
आशा
तुझ्या वाटेवर मी
नेहमी रमत असतो
तू येशील सखे परत
याच आशेने जगत असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 22 April 2021
आठवणी
तुझ्या आठवणीत
किती अश्रू मी वाहावे
येऊन तू पुन्हा
मला पुनर्जीवित करावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 17 April 2021
तुझ्या वाटेवर
तुझ्या वाटेवर
थोडे रमायचे मला
तुझ्या प्रेमात
थोडे जगायचे मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझ्या वाटेवर
तुझ्या वाटेवर
थोडे रमायचे मला
तुझ्या प्रेमात
थोडे जगायचे मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 13 April 2021
वेळ
तुझी वाट पाहताना
वेळेच भान राहत नाही
तु आल्यावर सखे
वेळेलाही सुचत नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माणूस
माणसाने माणसासारख वागाव
हीच आहे रीत
तुम्ही कसे ही वागा
मी माणुसकीतच ठीक
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 8 April 2021
चार ओळी
चार ओळी काय लिहिल्या तुझ्यावर
तू तर ठाकू लागली
पुन्हा नव्याने चार ओळी
तू सुचवू लागली
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 2 April 2021
वाट
तुझ्या वाटेवर मी उभा आहे
येशील का परत तू
लिहून झाल्या चार ओळी, ऐकून
देशील का दाद तू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 1 April 2021
अबोला
अबोला तुझा हा
किती काळ टिकेल
माझी फक्त एक मिठी
सगळच मोडीत काढेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 18 March 2021
नजर
न बोलता मनातले
मी बरेच काही बोलावे
नजरेला नजर मिळता
तू अचूक मनातले ओळखावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Sunday, 14 March 2021
अव्यक्त
अव्यक्त दुनिया सारी
जिथे लिहतो मी अजून
बहरून जावे चारी दिशांनी
तू दिसता मी संपून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 5 March 2021
ज्ञान
ज्ञान प्राप्तीसाठी सुध्दा
नशिब लागते
इतक्या सहजासहजी थोडीच
देव भेटते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Sunday, 28 February 2021
युध्द
जिथे हरलो
तिथून सुरुवात करू
आणि हरलेले युध्द
जिंकूनच दाखवू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Sunday, 14 February 2021
गीत
होऊनी स्पर्श तुझा
जगी मी स्वप्नाचे
गा सखे गीत माझ्या
तू... प्रेमाचे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 22 January 2021
कशी असावी
कशी असावी
लाखात एक नसावी
पण मनामध्ये अशी
घर करणारी असावी
आठवल्यावर आठवेल
अशी नसावी
स्वप्नात रोज
दिसणारी असावी
रस्त्याने जाताना
माझ्याकडे बघून हसणारी नसावी
पण डोळ्यांनी
बरच काही सांगणारी असावी
भेटायच असेल तर
माझी वाट पाहणारी नसावी
पण मी आल्यावर
मला पुन्हा भेटणारी असावी
माझ्या 'हो' मध्ये
'हो' म्हणणारी नसावी
सतत मला
त्रास देणारी असावी
फार अशी सुंदर नसावी
पण तिला पाहून काही तरी सुचले पाहिजे
अशी असावी
माझ्या कवितेंवर
दाद देणारी नसावी
पण माझ्या कवितेंवर
लाजून हसणारी असावी
अशी हसावी
✍
_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)