Sagar Laholkar
Thursday, 30 June 2022
तू
तू
धो धो तू बरसावे
माझ्या प्रेमाच्या ओळीत
प्रेमाचे नवे अंकूर फूटावे
माझ्या प्रत्येक चारोळीत
गंध पसरून व्हावे
अंग अंग रोमांचित
जितकी दूर तू
तितकीच खोल असावी... काळजात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 14 June 2022
सोहळा आनंदाचा
सोहळा आनंदाचा
सोहळा आनंदाचा
प्रत्येकाने जपू
एक एक क्षण
नव्याने जगू
असतील मतभेद
दूर आपण करू
येऊन सगळ्यांनी एकत्र
प्रेमाचे बीज लावू
नको कोणाचा व्देश
प्रेम आपण वाटू
येणाऱ्या नव्या पिढीला
एक आदर्श ठेवू
माणुसकीची हरितक्रांती
जगात आपण घडवू
सर्व जाती धर्म
सुखाने नांदू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 10 June 2022
अभंग - विठ्ठल
पंढरीची आस | लागे जीवा माझ्या |
भक्तीचा सागर | आषाढीचा ||
पाऊले पडती | सुर्य आग ओती |
भक्तीचा गारवा | विठ्ठलाचा ||
नाही आता भान | भक्तांचा सन्मान |
केला तू उद्धार | पंढरीचा ||
वारकरी आम्ही | नित्य येतो दारी |
उभा राहा पाठी | पांडुरंगा ||
भक्त आम्ही दारी| डोळ्यांतूनी पाणी |
उभा विठेवरी | कल्याणाचा ||
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Sunday, 5 June 2022
दादा
तू दादा म्हणून प्रिये
स्पर्धेतून बाद केल मला
मग स्वप्नात तू येऊन
का?... छेडतेस मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 4 June 2022
घाव
घाव
पश्चाताप होईल
ढसढस रडशील
तू दिलेले घाव
जेव्हा आठवशील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
इतिहास
इतिहास
घरा पासून दूर गेल्यावरच
यशाच शिखर गाठता येते
हवी फक्त जिद्द आणि चिकाटी
मग इतिहासही घडवता येते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)