Tuesday, 14 June 2022

सोहळा आनंदाचा

सोहळा आनंदाचा 

सोहळा आनंदाचा
प्रत्येकाने जपू
एक एक क्षण
नव्याने जगू

असतील मतभेद
दूर आपण करू
येऊन सगळ्यांनी एकत्र
प्रेमाचे बीज लावू

नको कोणाचा व्देश
प्रेम आपण वाटू
येणाऱ्या नव्या पिढीला
एक आदर्श ठेवू

माणुसकीची हरितक्रांती
जगात आपण घडवू
सर्व जाती धर्म
सुखाने नांदू
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला 

No comments:

Post a Comment