Tuesday, 9 August 2022

दगा

दगा

तुझ्या वाटा ओल्या झाल्या
माझ्या अश्रूंनी
दिले वचने खोटे झाले 
तुझ्या कृपेनी 

समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला

तुझ्या वाटेवर रमतो क्षणभर
सखे तुझी आस लागे जीवाला
अश्रू पुसूण पुन्हा हसून
सखे कसा बसा लागतो मी जगायला

कठीण आहे अवघड नाही
तुझ्या शिवाय जगायला
अरे तुझ प्रेम नाही तू नाही
मग मी देवदास बनायच कशाला

तुझ्या आठवणीचा
ऋणी मी कायम
तू दिला दगा
मी ठेवला सयम

पश्चाताप करून
सखे काय मिळत तूला
लक्षात ठेव मी वह्राड प्रेमाचा
तू दिला दगा
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला


No comments:

Post a Comment