Tuesday, 31 January 2023

गद्दार

गद्दार 

तुम्ही ज्याचा विरोध कराल
आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
तुम्ही देशभक्तीचा बाजार मांडाल
आम्ही लोकशाहीचा जागर करू

अधंभक्त तुमचे 
असतील खोट्या देशभक्तीच्या हिंदूत्वाच्या मागावर
पण राहू आम्ही सदैव 
गरीब शेतकरी जनतेसोबत आघाडीवर

उपाशी झोपते जनता हे बांधात मोठमोठी मंदीरे
काय दयनीय अवस्था आली देशावर
बाप मोजतो महागाईचा पाडा
थोडासाही फरक नाही पडला छप्पन इंचाच्या छातीवर 

बेरोजगारीने शिखर गाठला
दिसली नाही बातमी मीडियावर
होता म्हणे चौथा स्तंभ लोकशाहीचा
पण देशात द्वेष पसरविण्यात अव्वल जाती धर्मावर 

जो तो बोंब मारतो सोसतो चुपचाप
तरी सुधरत नाही आम्ही मत मारतो जाती अन पैश्यावर
होईल काय या देशाचे मी सांगायला नको
या देशाचे गद्दार तुम्ही पुन्हा या मातीत जन्मायला नको 

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

No comments:

Post a Comment