Sunday, 9 July 2023

खरा चेहरा

गोड बोलणारी माणस
म्हणजे विषारी साप
एक क्षण ही वाया न गमावता
सावध व्हा आज

चेहऱ्यावर असतात खोटे मुखवटे 
उशीराने खरा चेहरा कळतो
वेदना होतात खूप काळजाला
पण जीवनाला एक नवा अनुभव मिळतो

सावध राहतो आपण 
जीवनाच्या प्रत्येक पावलावर
मग जीवन होते सुंदर
माणसाचा खरा चेहरा ओळखल्यावर

✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

No comments:

Post a Comment