जीवन जगताना कधी कधी
आत्मपरीक्षण केलच पाहिजे
कुठे चुकलो आपण
हे समजले पाहिजे
दूर लोटले असेल सहज नाते तुम्ही
आम्ही तर नेहमी तुमच्याजवळच आहोत
क्षणाक्षणाला तुमच्या विचारातच आम्ही, आनंदाने जगत आहोत... दोन पावले मागे घेणे, प्रेमात लाज वाटते हल्ली... मग कशी सजेल टवटवीत फुलांनी प्रेमाची गल्ली... तरी आमची प्रेमाची बाग ही नेहमीच आनंदाने प्रेमाने तुमच्या विचाराने बहरलेली असेल... तिथे फक्त तुमची कमी, प्रेम माझ उरेल....
No comments:
Post a Comment