Saturday, 24 August 2024

दगा

दगा

तुझ्या वाटा ओल्या झाल्या
माझ्या अश्रूंनी
दिले वचने खोटे झाले 
तुझ्या कृपेनी 

समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला

तुझ्या वाटेवर रमतो क्षणभर
सखे तुझी आस लागे जीवाला
अश्रू पुसूण पुन्हा हसून
सखे कसा बसा लागतो मी जगायला

कठीण आहे अवघड नाही
तुझ्या शिवाय जगायला
अरे तुझ प्रेम नाही तू नाही
मग मी देवदास बनायच कशाला

तुझ्या आठवणीचा
ऋणी मी कायम
तू दिला दगा
मी ठेवला सयम

पश्चाताप करून
सखे काय मिळत तूला
लक्षात ठेव मी वह्राड प्रेमाचा
तू दिला दगा
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला


आठवणी

आठवणी

तुझ्या आठवणी मोजक्या आहेत
पण पुरेशा आहेत मला जगण्यासाठी
तसाच माझा प्रत्येक जन्म
राहील फक्त तुझ्यासाठी

✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                         अकोला

प्रेम

जीवन जगताना कधी कधी
आत्मपरीक्षण केलच पाहिजे
कुठे चुकलो आपण
हे समजले पाहिजे

दूर लोटले असेल सहज नाते तुम्ही
आम्ही तर नेहमी तुमच्याजवळच आहोत
क्षणाक्षणाला तुमच्या विचारातच आम्ही, आनंदाने जगत आहोत... दोन पावले मागे घेणे, प्रेमात लाज वाटते हल्ली... मग  कशी सजेल टवटवीत फुलांनी प्रेमाची गल्ली... तरी आमची प्रेमाची बाग ही नेहमीच आनंदाने प्रेमाने तुमच्या विचाराने बहरलेली असेल... तिथे फक्त तुमची कमी, प्रेम माझ उरेल....

गंध प्रेमाचे

गंध प्रेमाचे 

गंध प्रेमाचे
पसरले चौफेर 
तू दुर साजणी 
मनात खोलवर 
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला