Wednesday, 9 September 2026

गुपित

धोडे डोळ्यात बघू दे तुझ्या 
गुपित भावनांचे वाचू दे मला 
जे ओठावर कधी आलेच नाही 
ते गुपित तुझ्या मनातले कळू दे मला 
✍️ ______सागर लाहोळकार 
                 ८९७५१३९६०४ 
                     अकोला 

Friday, 19 June 2026

आठवणी

काळोख रात्रीचा
एकांत वाटणीचा 
मनात पूर दाटतो 
सखे तुझ्या आठवणींचा
          ✍️ _____सागर लाहोळकार
                          ८९७५१३९६०४
                                अकोला

Monday, 15 June 2026

राणी

पाहुणी, तुला मी
गेलो हरवून
तू कुठल्या नगराची राणी 
गेली मनात घर करून
✍️ ____सागर लाहोळकार
              ८९७५१३९६०४
                   अकोला 

पार्लर

पार्लर

पार्लरला जाऊन थोबाड रंगवून,
बाहेर तू कुठे मटकते,
अग तोंडाला लावले केमिकल  
उद्या त्याने कॅन्सर होते

फेअरनेस क्रिमच्या नादात पोरी
तू चुना स्वतःलाच लावते
क्षणिक त्या ग्लोच्या नादात 
तुझी स्किन पार आतून जळते

पावडरचा थर आणि लिपस्टिकचा डार्क शेड
चेहरा तुझा चमकावतो
पण घामाची एक सुटली धार की
भुतही तुला बघून पळतो

केमिकलचे हे लावून लेप
फक्त नवऱ्याच्या पैशांचा भुगा होतो,
आरोग्य धोक्यात घालून तुझे
फक्त पार्लरवाल्यांचा धंदा होतो

सोडून दे आता, सखे हा कृत्रिम थाट,
अन् खोटा मुखवटा हा बाजूला सार,
घरच्याच नैसर्गिक उपायांनी
रूप तुझे निखार
               ✍️ _______सागर लाहोळकार
                                   ८९७५१३९६०४ 
                                        अकोला 

Thursday, 11 June 2026

मन

मनानी मनाला हाक दिली
प्रेमाची नवी पहाट फुलली
गुंफून हात हातामध्ये
आपली रेशीमगाठ जुळली
         ✍️ ______सागर लाहोळकार
                            ८९७५१३९६०४
                                  अकोला

शेवटचा लढा

॥ शेवटचा लढा ॥
निवडणूक झाली,
गॅस पेट्रोलचे भाव वाढले,
अंधभक्त म्हणाले,
अच्छे दिन आले!

मीडिया विकली,
निवडणूक आयोग विकले
सत्याचे गळे इथे
भरचौकात आवळले.

हातात डिग्री असूनही
तरुण आज वणवण भटकतोय,
बेरोजगारीच्या फासावर
स्वप्नांचा गळा रोज घोटतोय

'भजी तळा' सांगणारे
सत्तेच्या खुर्चीत बसले,
अन हक्काच्या नोकरीसाठी
सर्व तरुण फसले

घरातला गॅस आता
शोभेची वस्तू झाली,
महागाईची झळ
गरिबाच्या थेट ताटापर्यंत आली

तेल-डाळीचे भाव बघून
सर्वसामान्य माणूस हादरला,
पण जाहिरातींच्या झगमगाटात
विकास मात्र सावरला

व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीत
रोज खोटं पेरलं जातंय
अंधभक्तीच्या नादात
रोज देश अधोगतीकडे जातंय

जागे व्हा जनता
आता तरी डोळे उघडा
तुमच्या हक्काच्या भाकरीसाठी
आता शेवटचा लढा उभारा.

✍️ ______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                          अकोला


Saturday, 6 June 2026

संविधानाचा हिशोब

 आमदार फुटतो, पक्ष फुटतो

भुटतात इथे पेपर
महागाई चालली वाढत
काय करणार हो लेबर

मन की बात सांगतो, रूपया घसरतो
स्वतःलाच विश्वगुरू म्हणतो
विदेश निती न खाली माती
हा ट्रम्प पुढे सलेंडर होतो

मिडिया विकली, देश विकला
विकली इथे इमानदारी
पैश्यासाठी झाले सर्व लाचार
विसरले आपली जबाबदारी

बलिदान दिले स्वातंत्र्य मिळाले
या दिवसांसाठी नाही
लोकशाहीचा तुम्ही गळा घोटताना
थोडीशी लाज वाटत नाही

जय श्रीराम म्हणवता,
धर्मा धर्मात भांडवता
अजून किती मुर्ख
समजाल आम्हाला

अहो अती केली तुम्ही,
मती नाही गेली आमची
आता सत्तेतून खाली खेचण्याची
वेळ आली तुमची

उठाव होईल, क्रांती होईल
पुन्हा नव्याने लोकशाही बहरील
तुमच्या सगळ्यांचा हिशोब
सविधांनानेच चुकता करून
हा देश पुन्हा नव्याने उभा राहील!!!
✍️ _______सागर लाहोळकार
                    ८९७५१३९६०४
                          अकोला 

#मराठीकविता #राजकीयकविता #लोकशाही #संविधान #क्रांती #मराठीलेखक #सागरलाहोळकार #अकोला #विद्रोह #मराठीसाहित्य #जागेव्हा #महागाई #युवाआवाज #PoliticalPoetry #SaveDemocracy #MarathiPoem