बीज
ती आली मनामध्ये
बीज रोऊन चालली गेली
परत तीने वळुन ही नाही बघितले
त्या बीजाचे काय झाले
बीजाचे रोप झाले
ऊन पाऊस वारा
या सगळ्या संकटाना
सामोरे जाऊन त्या रोपाचे काय झाले
रोपाचे झाड झाले
एकदा पावसाळी वादळात
त्या झाडाने तिला आश्रय दिला
वादळ शांत झाले ती सुखरूप निघून गेली
तीने वळुन ही नाही बघितले
झाडाचे काय झाले
झाड जमीन दोस्त झाले
तीने वळुन ही नाही बघितले
ती आली
मनामध्ये बीज रोऊन
चालली गेली
वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला
Saturday, 31 December 2016
बीज
Sunday, 25 December 2016
प्रेमात
प्रेमात
प्रेमात पडायचे
प्रेम अनुभवायचे
प्रेम हे प्यायचे नसते
प्रेम पिल्याने संपते
म्हणुन
प्रेम हे करत नसतात
प्रेम हे जाणवत असतात
प्रेम केल्याने संपते
जाणवल्याने वाढते म्हणून
तीच्याशी मी नाही बोलणार
आयुष्यभर तिच्यावर प्रेम करणार
तीला नकळत तिच्यावरील संकटे दुर करणार
तीला रोज पाहणार
तीला रोज जाणनार
तीला मी आवडत नसणार
ती माझ्याशी कधीही नाही बोलणार
तरी
तिच्यावरच प्रेम करणार
वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला
Wednesday, 21 December 2016
माणुस
माणुस
जेवण करण्यासाठी भुक असावी लागते
समजण्यासाठी डोके असावे लागते
रडण्यासाठी अश्रु असावी लागतात
शिक्षण घेण्यासाठी आस असावी लागते
ध्येय प्राप्तीसाठी जिद्द असावी लागते
स्वप्न पाहण्यासाठी झोप असावी लागते
स्वप्न पुर्ण करण्यासाठी
मनगटामध्ये जोर असावा लागतो
भाडण्यासाठी कारण असावे लागते
युद्धासाठी शस्त्र असावी लागतात
हसवण्यासाठी हसवावे लागते
आणि
प्रेम करण्यासाठी मन असावे लागते
मन असण्यासाठी माणुस असावे लागते
माणूस हा जिवंत असायला पाहिजे
वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला
Tuesday, 13 December 2016
मराठे
मराठे
पुन्हा इतिहास घडण्यासाठी सज्ज आहे
संपूर्ण मराठे एकत्र येत आहे
आम्हीच मराठे दुसर्यासाठी लढलो
आज मात्र स्वतः साठीच लढावे लागत आहे
अनेक विश्वविक्रम मोडणार आहेत
इतिहास पुन्हा घडणार आहे
संपूर्ण मराठे एकत्र येणार आहे
सागर लाहोळकार
अकोला
Sunday, 11 December 2016
जेव्हा
जेव्हा
जेव्हा काळीज घेऊन
रस्त्याने चालत होतो
वळून ही
कोणी बघत नव्हते.
आज मात्र
तळहातावर
मस्तक
घेऊन चाललो
संपूर्ण गाव मागे येत होते.
सागर लाहोळकार
अकोला
Sunday, 4 December 2016
राहुल गांधी
ही कविता तेव्हा सुचलेली आहे जेव्हा भारतीय जनता पार्टी ची पुर्ण बहुमताने सत्ता आली होती आणि त्यानंतर प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली या कवितेचा उद्देश कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही आहे आणि कुणालाही दुःखवने हा उद्देश नाही कवितेचे नाव आहे राहुल गांधी
राहुल गांधी
कुठे गेले सायचे कार्यकर्ते
इकडे हुन रायले माया जीवाचे येले उदो उदो करणारे
दुर गेले सारे आता जिकडे तिकडे मोदीचेच नारे.
काय करू कस करू समजुन नाही रायल
इकडे माया जुगाड जमुन नाही रायल
(राहुल चे स्वप्न सुरू होते)
राहुलन स्वप्नात लावला सनी लीवाँनीशी जुगाड
म्हणे रोज रात्री लिपस्टिकन रंगे थोबाड
दरवाजावर होते नितीशकुमार राहुलच झाल सनीशी लग्न
आई म्हणे बाबु काही येत नाही कायले केल त्व्या लग्न
राहुल म्हणे ज्या प्रकारे आपल्याले काही न येता एक संसार देशासोबत मांडला
त्याचप्रकारे म्या इच्या सोबत ही संसार मांडला.
खर खोट बोलुन सनीले आणल घरी
सगळी वार्ता देशात पसरली
अबु हाजमी सांगे शरद पवार आणि लालुले सूनबाई चे सिनेमातले लफडे
ऐकून एक एक कारनामा
शरद पवार आणि लालु चा
पेजामा कवरेज पकडेना मामा
लग्नाचा जल्लोष सुरु होता शोषात लागले तिथे मोदीचेच नारे
राहुल घामाजलेला (कारण मोदीजी ही सिगल) झाला कसाबसा सावरला आणि
झोपेतून उठला
राहुल म्हणतो आईला
आई दुधात बोरविटा टाकुन आण
आणि मोदीला कस हाणू सांग
आई म्हणते बाळा
बस झाली आपली घान
आता मोदीलाच काम करु दे छान
सागर लाहोळकार
अकोला