Monday, 29 May 2017

आठवण

आठवण
ती गेली गावाला
मी बसलो आठवायला
कधी संपतो उन्हाळा
शाळा सुरू होईल
तेव्हा लागेल
माझ्या प्रेमाचा पावसाळा

अश्रु लागले वाहायला
शक्य नाही
मला आवरायला
वर्षावर वर्षे
निघून चालली
प्रत्येक सेकंदाला

वाट पाहतो तुझी
रस्त्याच्या कडेला
येशील तु मला
अचानक भेटायला
जिथे तिथे तु दिसते
भास किती या डोळ्यांना
✍__________सागर लाहोळकार
                       ८९७५१३९६०४
                           अकोला

Friday, 26 May 2017

मी होतो

मी होतो

मी चांदण्यात तिचे चित्र काढत होतो
सूर्याला उगवण्यापासुन थांबवत होतो 

ती पावसात भिजत होती
मी काळ्या आभाळांना थांबवत होतो

ती अंधारात भीत होती
मी विजा घेऊन आलो होतो

ती सावलीत थांबली होती
मी झाड हलवत होतो

सूर्याला अजुन आग
ओतायला सांगत होतो

आवाज तिने मज देता
मी पळत जात होतो

घरा पर्यंत तिला सोडुन
मी ही संपत होतो...
✍_______________सागर लाहोळकार
                                 ८९७५१३९६०४
                                      अकोला

Saturday, 13 May 2017

दिसतच नाही मला

दिसतच नाही मला

जे दिसायच ते दिसत नाही
जी आवडते तिला मी आवडत नाही

जी स्वप्नात आहे ती वास्तवात नाही आहे
जे मनात आहे ते ओठांवर नाही आहे

शोधत आहे तिला
पण सापडत नाही आहे मला

आता विसरायचो म्हणतो तिला
विसरता ही येत नाही मला

हे सगळ सांगायचे आहे तिला
पण भेटत ही नाही मला...
✍___________सागर लाहोळकार
                         ८९७५१३९६०४
                              अकोला

Monday, 1 May 2017

ससा

तिच्याशी मी बोलु कसा
मी आहे भित्रा ससा
प्रेम करतो तिच्यावर
तिला सांगु कसा

मी रोज जगतो कसा
रोज तिच्या मागावर असतो असा
ती वळुन ही माझ्याकडे पाहत नाही
मी मागेच राहतो तसा

तिच्या घरा जवळ मी असतो कसा
मंदिराला प्रदक्षिणा मारतो अशा
ती मला पाहुन कावळ ही बंद करते
मला पाहून ही चालली जाते

तिच्याशी बोलायला जाऊ कसा
गेल्यावर तिला थांबु कसा
तिनेही मला समजुन घ्यावे
मी आहे भित्रा ससा
  ✍___________सागर लाहोळकार
                            ८९७५१३९६०४
                                  अकोला