आठवण
ती गेली गावाला
मी बसलो आठवायला
कधी संपतो उन्हाळा
शाळा सुरू होईल
तेव्हा लागेल
माझ्या प्रेमाचा पावसाळा
अश्रु लागले वाहायला
शक्य नाही
मला आवरायला
वर्षावर वर्षे
निघून चालली
प्रत्येक सेकंदाला
वाट पाहतो तुझी
रस्त्याच्या कडेला
येशील तु मला
अचानक भेटायला
जिथे तिथे तु दिसते
भास किती या डोळ्यांना
✍__________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment