मी होतो
मी चांदण्यात तिचे चित्र काढत होतो
सूर्याला उगवण्यापासुन थांबवत होतो
ती पावसात भिजत होती
मी काळ्या आभाळांना थांबवत होतो
ती अंधारात भीत होती
मी विजा घेऊन आलो होतो
ती सावलीत थांबली होती
मी झाड हलवत होतो
सूर्याला अजुन आग
ओतायला सांगत होतो
आवाज तिने मज देता
मी पळत जात होतो
घरा पर्यंत तिला सोडुन
मी ही संपत होतो...
✍_______________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment