बोल
आता तु बोल
मला ऐकू दे
ह्रदयात तुझ्या
मला राहु दे
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 29 June 2017
Monday, 26 June 2017
Sunday, 25 June 2017
आठवल्यावर
तुझी वाट पाहताना
वेळही नाही कळत
सुर्य उगवतो आणि मावळतो
तु येत नाही
आठवल्यावर
स्वतःवरच हसतो आणि रागावतो
✍________सागर लाहोळकार
अकोला
Saturday, 24 June 2017
Thursday, 22 June 2017
Tuesday, 13 June 2017
चोरी
मला भिती वाटते
पोस्ट करायला
कारण येथे बरेचजण येतात
चोरी करायला
तरी मी अधुन मधुन
टाकतोच एखादी पोस्ट
कारण मला सांगायची असते
माझ्या मनातील गोष्ट
माहीत नाही
काय भेटते या लोकांना
स्वर्ग मी पाहतो
सांगतात ते लोकांना
चोरी करा चोरी बदल
हरकत नाही
नाव बदलल्यावर
कोणी बुध्द होत नाही
आज ना उद्या तुमची
चोरी समोर येईल
हाथी आल्यावर
कडक कारवाई होईल
विश्वास उडेल
लोकांचा तुमच्यावरून
आरशातही तुमची
मान राहिल झुकून
✍__________________सागर लाहोळकार
अकोला
Monday, 12 June 2017
प्रेमात धळपळ
रोज तिला पाहण्यासाठी मी करतो धळपळ
ती दिसली की ह्रदयात वाढते धळधळ
ती गेली की तिच्या मागे पळपळ
स्वप्नात ही तिला पाहण्यासाठी करतो मी मरमर
रोज असतो मी तिच्या अवतीभवती
काम नसताना ही फिरतो तिच्या घराभोवती
मन फक्त माझ तिच्यात भिरभिरत
तिच्याच विचारत फक्त मला करमत
रोज तिला पाहतो रोज ती दिसते नवी नवी
रोज वाटत ती मला हवी हवी
✍_________________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
भाग्य माझ्या प्रेमाचे
भाग्य माझ्या पेनाचे जो स्पर्श तिने केला
भाग्य माझ्या प्रेमाचे जो स्पर्श माझा अधुरा
भाग्य माझ्या डोळ्यांचे जे रोज पाहतात तिला
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज टाळतात मला
भाग्य माझ्या स्वप्नांचे जे रोज तिला सजवितात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज अर्ध्या वर राहतात
भाग्य माझ्या पावलांचे जे रोज तिच्या घराकडे वळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज बदनाम मला करतात
भाग्य माझ्या ह्रद्याचे जे ती आल्यावर धळधळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे ती गेल्यावर हरवतात
भाग्य माझ्या अश्रुचे जे तिच्या आठवणीत वाहतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे मलाच रडवतात
✍_____________________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला