Monday, 12 June 2017

भाग्य माझ्या प्रेमाचे

भाग्य माझ्या पेनाचे जो स्पर्श तिने केला
भाग्य माझ्या प्रेमाचे जो स्पर्श माझा अधुरा

भाग्य माझ्या डोळ्यांचे जे रोज पाहतात तिला
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज टाळतात मला

भाग्य माझ्या स्वप्नांचे जे रोज तिला सजवितात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज अर्ध्या वर राहतात

भाग्य माझ्या पावलांचे जे रोज तिच्या घराकडे वळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज बदनाम मला करतात

भाग्य माझ्या ह्रद्याचे जे ती आल्यावर धळधळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे ती गेल्यावर हरवतात

भाग्य माझ्या अश्रुचे जे तिच्या आठवणीत वाहतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे मलाच रडवतात

✍_____________________सागर लाहोळकार
                                             ८९७५१३९६०४
                                               अकोला

No comments:

Post a Comment