मला भिती वाटते
पोस्ट करायला
कारण येथे बरेचजण येतात
चोरी करायला
तरी मी अधुन मधुन
टाकतोच एखादी पोस्ट
कारण मला सांगायची असते
माझ्या मनातील गोष्ट
माहीत नाही
काय भेटते या लोकांना
स्वर्ग मी पाहतो
सांगतात ते लोकांना
चोरी करा चोरी बदल
हरकत नाही
नाव बदलल्यावर
कोणी बुध्द होत नाही
आज ना उद्या तुमची
चोरी समोर येईल
हाथी आल्यावर
कडक कारवाई होईल
विश्वास उडेल
लोकांचा तुमच्यावरून
आरशातही तुमची
मान राहिल झुकून
✍__________________सागर लाहोळकार
अकोला
No comments:
Post a Comment