'' चाल बर, लवकर काहितरी खाय्याले दे''
'' बापा,आज तर लय लवकर भुक लागली तुम्हाले ''
'' मग नाहीत काय वजन वाढते म्हणून काल रात्री कमीच जेवलो, पण आता पोटात कावळे अळाऊन रायले ''
'' थाबा मग जरा, मी बात पोया टाकते''
'' म्हणजे त्व्या आतापर्यंत स्वयपाकच केलाच नाही ''
''मले काय दहा हात हाय''
'' मग सकाऊन पासून काय केल त्व्या बसली अशीन टिव्ही पायत जरा कमी पायत जायन टिव्ही''
'' मले का काम कमी हायत पोट्याइच करा लागते त्यायले शाळेत पाठवा, कपडे धुव्वा, भांडे खासा, घर आवरा आणि टिव्ही पायाले टाइम कुठी भेटते मले ''
'' मग काही घरात खाय्याले तर करून ठेवत जाय ''
'' ख्खाना, मले''
'' खाल असत तुले पण मी शाकाहारी हावन ''
'' बस्सा आता चुप झाली पोयी खा आता मुकाट्यानं''
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment