Thursday, 11 April 2019

नरेंद्र मोदी पोवाडा

अहो मोदीजी जीर राजे र जी जी
भारताचा एक नरवीर
लय धुरंधर
गाजतो जगभर
मोदी नामाची उसळी लाट
राजकारणाच्या रणांगणात
विरोधक केले त्याने भुईसपाट जी...

नरेंद्र मोदी यांनी राजकारणात उडी घेतली आणि त्यांना जनतेने भरभरून आशिर्वाद सुध्दा दिला

जनतेने आशिर्वाद दिला
नरेंद्र मोदी सायबाला
अटल बिहारीचा हा चेला
अमित शहा त्याच्या मदतीला
अहो मोदीजी जीर राजे र जी जी

भारतीय जनता पार्टीने इतिहास घडविला इतिहास घडविला...
मोदीजी झाले प्रायमिनिस्टर
दिसती शोभुनि लाल किल्ल्यावर
अहो मोदीजी जीर राजे र जी जी

मोदीजीने आपल्या पहिल्याच भाषणात लोकांची मने जिंकली आणि सबका साथ सबका विकास हा नारा दिला

मोदीजीच पहिल भाषण
देशाला दिल वचन
करेल मी विकास देशाचा
आशिर्वाद हवा मज सर्वाचा
आहे चौकीदार मी तुमचा जी...

भाजपाच आल सरकार... (३)
आॅनलाईन झाले व्यवहार
थांबविला काळा बाजार
बंद केला भ्रष्टाचार
हक्काच दिल सर्वाना घर
ग्रामीण महिलांना आधार
बंद केला चुलीचा धुर
देऊन सिलेंडर जी....

एकीकडे मोदीजीने विकासाचा सपाटा लावला तर दुसरीकडे आपलाच शेजारी असलेला देश पाकिस्तान त्याच्या कुरापत्या दिवसेंदिवस वाढतच होत्या त्यासाठी मोदीजीने एक निर्णय घेतला आणि मग

मोदीजीने बेत बघा आखला
सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला हो जी...

नरेंद्र मोदी यांनी सर्वणाना आरक्षण दिल इतकेच नव्हे तर गोमातेचे रक्षण केले तरूणांना रोजगार दिला उद्योगधंदे वाढायला लागले म्हणून लोक म्हणु लागले हर हर मोदी घर घर मोदी..

सर्वणाना दिल आरक्षण
गौमातेच करून रक्षण
कौशल्य विकासच देऊन शिक्षण
आणली नोटबंदी घडवून
काढले बाहेर काळेधन
थांबविले ते करपशन
स्किल इंडियाच निर्माण
२०२२ गगनयान अभियान जी....

मोदींची बघुन लाट विरोधक म्हणाले कोण रे हा मोदी... तो चायवाला आणि तो आपल काय बिघडवणार असे म्हणुन सगळे विरोधक होते बेसावध
पण मोदी होते पुर्ण देशांची आवाज

इतिहास मोदीजीने केला
६० वर्षांत जमल नाही कोणाला
स्वच्छ भारत मिशनाला
हागणदारी मुक्त गाव केला
तरूणांना रोजगार दिला
उद्योगधंदे लागले वाढायला
डिजिटल इंडिया झाला
विकासाचा शेखर गाढला
देशाचा मान वाढला
बुलेट ट्रेन सज्ज धावायला
विरोधकांना नव्हता एकही मुद्दा
विरोधकांना घाम फोडला

राजकारणात सघाभाऊ सावत्र असतो येथे मोदींना हरवण्यासाठी सारे विरोधक झाले एकत्र
पण मोदी होते सव्वाशे करोड जनतेचे स्वप्न

पाडायला मोदी सरकार
विरोधक झाले तयार
चढवून स्वरांवर स्वर
मारूनी थिप डफावर
सांगतो लाहोळकार खर
............ शाहीर
सत्तेत येईल पुन्हा नरेंद्र मोदी सरकार जी....

  ✍________सागर लाहोळकार
                      ८९७५१३९६०४
                           अकोला

No comments:

Post a Comment