तु दादा म्हणून प्रिये
स्पर्धेतून बाद केल मला
मग स्वप्नात तु येऊन
का छळतेस मला
पण एक सांगू प्रिये
तु दिसल्यावर प्रिये
गुदगुल्या होतात मनात
काहीतर आपल नात
असाव आधीच्या जन्मात
विचारांचा नेहमीचाच गोंधळ
तु दिसल्यावर शांत होतो
चेहऱ्यावर येते हास्य
आणि तुझ्यातच मी हरवतो
वाटल कळतील तुला सगळे
नजरेतूनी भाव माझ्या मनातले
पण अचानक तु मला
दादा म्हणून संबोधिले
तु दादा म्हणताच प्रिये
स्वप्नातुन मी जागा झालो
आता तु दिसता क्षणी
मी दुसर्याच गल्लीतुन पळतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment