Thursday, 21 July 2022

बाप

बाप

या जगात शब्द नाही
बापावर लिहायला
किती दुःख झेलतो
पण सांगत नाही कोणाला

मारून स्वतःच्या इच्छांना 
दिवस रात्र राबतो
फक्त आपल्या मुलाच्या सुखासाठी
अख्ख आयुष्य पणाला लावतो

कितीही संकटे येऊ द्या
पण पाय त्याचे डगमगतील नाही
मुलाच्या पाठीशी खंबीर उभा
या जगात दुसरा कोणी नाही

नाही कुठली अपेक्षा
मुल उतरत्या वयात वागवेल 
कर्तव्य त्यांचे इतके मोठे
त्या देवालाही लाजवेल

शेवटच्या श्वासापर्यंत  काळजी एकच
फक्त आपल्या मुलाची
तरी पुन्हा नव्याने हसत जन्म घेतो "बाप"
फक्त आपल्या मुलासाठी
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

No comments:

Post a Comment