Thursday, 13 April 2023

जुने दिवस

जुने दिवस 

जुने शाळेचे दिवस
आजही प्रिय वाटतात मला
शाळा सुटल्यावर मित्रासोबत
वेचायचो बोर आणि चिंचा

मस्ती करत जायचो घरी
कसलच भान नसायच
नव्हत दप्तराचे ओझ 
बिंनदास्त रानात फिरकायच

गुर ढोर असायचे सोबती
पायात चप्पल नसे
मारून नदीत उडी
कपडेही भिजत असे

गृहपाठाची चिंता नव्हती
नव्हत कुठल्या स्पर्धेचे भान
ठेवायचो आम्ही सदैव वडीलांचा
गुरूजींचा मोंठ्याचा मान

पण हल्ली हे सगळ पाहायला
मिळत नाही
गेले ते दिवस
आता परत येत नाही

✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                        अकोला

No comments:

Post a Comment