Sunday, 26 March 2017

मी होतो प्रेमात

मी होतो प्रेमात
ती गेली घरात
तिचा भाऊ आला रागात
बदबद मारल मला दारात 


मी होतो प्रेमात
ती काॅलेजात
मी बोललो तेवढ्यात
बाॅयफ्रेंडन दिली कानात 


मी होतो प्रेमात
ती गेली बाजारात
ती होती नाराज
मी होतो तीच्या आवाजात 


मी होतो प्रेमात
ती होती प्रेमात
मारणारे सगळे...
होते माझ्या लग्नात..
✍__________सागर लाहोळकार
                       ८९७५१३९६०४                                                                  अकोला

Friday, 24 March 2017

प्रेमात पुन्हा

ती दुर जाईपर्यंत मी तिला पाहतो
माझ तिच्यावर किती प्रेम आहे सांगतो
ती वळुन ही माझ्याकडे बघत नाही
तीचे माझ्यावर प्रेम आहे का?
हे ही सांगत नाही
होकार ही देत नाही नकार देत नाही
सुखाने मला जगुही देत नाही
येवढ सगळ झाल्यावर
दुसर्‍या दिवशी ती पाहते चोरून
मी पुन्हा जातो हरवून
बघेल मागे वळुन
याच विचारात  असतो अजुन
कळते पण तेच ते पुन्हा पुन्हा
प्रेमात करतो हाच माझा गुन्हा
__________सागर लाहोळकार
                           अकोला

Wednesday, 22 March 2017

वाट

तिची वाट पाहताना
वेळही माझ्यासोबत असते
माझी आठवणी तिच्यासोबत
तिची माझ्यासोबत असते.
✍__________सागर लाहोळकार
                            अकोला

Tuesday, 21 March 2017

वेळ

वेळ
आयुष्यात दुःखे कित्येक असावे
चेहर्‍यावर नेहमी हसु हसावे
आपल्याला जे करायचे
जीवनात ते कधीच नाही घडावे
आपण जीवनात काय करावे
वेळेनी नेहमी  ठरवावे
सांगतो मी आजही
प्रयत्न पुर्ण करावे
काही प्रश्न वेळेवरच सोडवावे ...
✍_______सागर लाहोळकार
                      अकोला.

Sunday, 12 March 2017

प्रेमाचे रंग

तुझ्या प्रेमात मला रंगु दे
गुलाबी रंग मला लाऊ दे
उधळु दे मला चौफेर प्रेमाचे रंग
माझ्या प्रेमात तु ही भिजुन घे...
निघणार नाही माझ्या प्रेमाचा रंग
त्यालाही तुच हवी संग
सातही रंग मिसळले
प्रेम माझे बहरले

✍___________सागर लाहोळकार 

                              अकोला