ती दुर जाईपर्यंत मी तिला पाहतो
माझ तिच्यावर किती प्रेम आहे सांगतो
ती वळुन ही माझ्याकडे बघत नाही
तीचे माझ्यावर प्रेम आहे का?
हे ही सांगत नाही
होकार ही देत नाही नकार देत नाही
सुखाने मला जगुही देत नाही
येवढ सगळ झाल्यावर
दुसर्या दिवशी ती पाहते चोरून
मी पुन्हा जातो हरवून
बघेल मागे वळुन
याच विचारात असतो अजुन
कळते पण तेच ते पुन्हा पुन्हा
प्रेमात करतो हाच माझा गुन्हा
✍__________सागर लाहोळकार
अकोला
No comments:
Post a Comment