जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय क्रिकेट संघ म्हणाव का ?
जगात सर्वश्रेष्ठ क्रिकेट संघ म्हणुन उदोउदो करणारी भारतीय क्रिकेट संघचे चाहते आणि मिडिया याच्या साठी भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप मधुन बाहेर पडणे हा भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना मोठा धक्काच आहे.
खरतर आपली भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कप मधुन तेव्हाच बाद झाला जेव्हा इंग्लंडनी आपला पराभव केला तेव्हाच संघाचे पातेले सगळ्यांसमोर उघडे पडले आणि आता साधा २४० रनचा पाठलाग करताना भारताची दाणादाण उडाली होती. सगळेच फलंदाज अपयशी ठरले परंतु ही अशी दाणादाण उडाली ही भारतीय क्रिकेट संघाची पहिली वेळ नाही आहे या आधी कित्येक सामन्यात अशी परिस्थिती आली होती मात्र त्यापासून भारतीय क्रिकेट टीम ने काहीही धडा घेतला नाही याच नवलच आहे.
भारतीय क्रिकेट टीम चे कप्तान विराट कोहली म्हणतात गोलंदाजी आणि शेत्र रक्षण फार चांगली कामगिरी त्यांनी केली आणि आम्हाला रोखून ठेवल अस वक्तव्य केल आहे
खरतर इंग्लंड आणि न्यूझीलंड या खेळाडूची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे ते खेळाडू कामगिरी चांगली करणारच आहे तुम्हाला फक्त खराब गोलदांजी वर खेळता येत हा त्याचा दोष नाही त्यांनी चांगली गोलंदाजी केली पण तुम्ही चांगली फलंदाजी करू नाही शकला हे महत्वाच तुम्हाला फक्त छोट्या छोट्या संघाशी खेळता येत जस वासरात लंगडी गाय शहाणी असा हा प्रकार आहे.
भारतीय क्रिकेट संघ चे एक दोन फलंदाजांनी खेळावे आणि बाकीच्यांनी खेळुच नये हे जणू एक सुत्रच झाले आहे. पण ज्या वेळी आपण जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय क्रिकेट संघ म्हणुन गोरवतो ते कुठल्या अर्थी कारण सर्वश्रेष्ठ म्हणून घेण्यासारखी खरच भारतीय क्रिकेट संघाची लायकी आहे का ? एकिकडे आपण आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडे बघता संपूर्ण खेळाडू ची कामगिरी ही स्तुतीमय आहे जिथे त्याच्या शेवटच्या खेळाडू पर्यंत सगळेच खेळतात. ज्या वेळेस आपण भारतीय क्रिकेट संघ ची तुलना इतर संघाशी करतो तर नक्कीच ह्याची जाणीव लक्षात येईल. दुसऱ्या टीमच्या आणि आपल्या खेळाडू मध्ये बरेच साम्य आहे.
जर भारतीय संघाचे एकदोन गोलंदाज सोडले जसे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार तर याच्या व्यतिरिक्त आपल्या गोलंदाजांना साधी बॅट सुध्दा पकडता येत नाही.
भारतीय क्रिकेट संघांमध्ये अकरा खेळाडू मधील मध्ये सहा फलंदाज त्यापेकी दोन खेळतात तर पाच गोलदांज आहे त्यांना फलदांजीतल काही कळत नाही तर मग अशी क्रिकेट ची सेना घेऊन तुम्ही कुठ पर्यंत जाल याच उत्तर प्रत्येकाला ठाऊक असेलच पण भारतीय संघाकडू खेळाडू ची कमी आहे असे मुळीच नाही १३० करोड च्या देशात साधे ११ खेळाडू नाही हे शक्य नाही मात्र भारत एक खुप मोठ्या वाईट गोष्टीने ग्रासलेला आणि ती म्हणजे राजकारण प्रत्येक क्षेत्रात राजकारण भारतीय क्रिकेट टीम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकारण चालत कित्येक चांगले प्लेयर बाहेर बसून ठेवले आहे. महेंद्र सिंग धोनी यांनी तर सगळा संघ आपली हाजीहाजी करणाऱ्यांनी भरून ठेवला आहे त्याच हे नुकसान भारतीय क्रिकेट संघाला सोसाव लागत आहे.
विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राॅबिन उधप्पा आणि ताज उदाहरण अबाती रायडु अशा दिग्गज खेळाडूंना बाहेर बसवने आणि ते खेळाडू करून करून करणार काय तर शेवटी त्यांना नाईलाजाने संन्यास घ्यायला भाग पाडणे हे देशाच सगळ्यात मोठे नुकसान आहे.
खेळा मध्ये राजकारण नकोच आज ही कित्येक आॅलम्पिक प्लेयर पोलीस भरतीच्या ग्राउंड वर पडलेले आहेत मार्गदर्शनाचा अभाव आणि राजकारणामुळे देशांची खुप हानी होत आहे उत्कृष्ट खेळाडूला संघामध्ये स्थान दिले पाहिजे आणि आज आयपीएल मधुन कित्येक प्लेयर येतात त्यातुन उच्च दर्जाचा संघ निर्माण करावा जो जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय क्रिकेट टीम असणार त्यासाठी अकरा खेळाडू ही आपल्या उत्तम दर्जाचे हवे त्याच्या कामगिरीने नक्कीच एक दिवस भारत जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट टीम बनेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment