Tuesday, 30 July 2019

प्रेम

बंद केले मी आता
प्रेमावर लिहीणे
येथे मन तर कोणालाच नाही
मग का उगाच आपण ते मिरवणे

शेवटी त्रास तर
आपल्यालाच होतो
जिथे आपण बिनधास्त असतो
तिथेच वार होतो

जर भेटत असेल तुम्हाला आनंद
तर शेकडो तुकडे करा माझ्या काळजाचे
तरी माझ्या काळजाचा प्रत्येक तुकडा
गीत गाईल फक्त...प्रेमाचे

✍_______सागर लाहोळकार
                     ८९७५१३९६०४
                         अकोला

No comments:

Post a Comment