Saturday, 28 May 2022

निरोप

निरोप 

मन आले भरून
काॅलेजचा निरोप घेतांना
आता यशाची नवनवीन शिखरे गाठू
आम्ही जीवन जगतांना

काॅलेजच्या नावाची किर्ती
चौफेर आम्ही गाजवू
घेऊन ज्ञानाचा भंडार
यशाला गवसणी घालू

गुरूंचा आशिर्वाद पाठिशी
मग पाय कसे डगमगतील
येऊ द्या कितीही मोठे संकटे
ईतिहास आमची दख्खल घेईल

गर्व नाही आम्हास
उज्ज्वल भविष्य जबाबदारीने आम्ही घडवू
स्वप्न पाहिलेले भारत देशाचे
साकार आम्ही करू

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

Thursday, 26 May 2022

छत्रपती

छत्रपती

 छत्रपतींच्या नावाने राजकारण करायच
आणि छत्रपतींनाच तिकीट नाही द्यायच
आता या कुत्र्यांच्या औलादींना
जनतेने जरा ओळखायला शिकायच

महाराष्ट्राच्या राजकारणात
छत्रपतींच्या नावाने पान सुध्दा नाही हालत
मग छत्रपतींना टिकीट नाही दिल
तेव्हा कुठल्याच पक्षाला लाज कशी नाही वाटत

बंद करा छत्रपतींच्या नावाने राजकारण 
बंद करा भाषणात त्याचा नावाचा वापर 
आणि द्या छत्रपतींच्या वंशजांना आदर
नाही तर त्या कुत्र्यांच्या औलादींनी लक्षात ठेवाव 
त्यांच्या नावाशिवाय तुम्हाला मिळणार नाही साधी भाकर

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                      अकोला

Tuesday, 24 May 2022

माणुसकी

हा "डे" तो "डे"
आता माणूस कंटाळला रे
आता जीवाला जीव देणारा
खरा माणूस भेटला पाहिजे रे
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                     अकोला

ओळख

स्वतःची ओळख निर्माण करा
जग दख्खल घेईल तुमची
इतरांन सारखे नका जगू
नाहीतर ओळखही नाही राहणार तुमची
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

माणुसकी

माणुसकी

हा डे तो डे
आता माणूस कंटाळला रे
आता जीवाला जीव देणारा
खरा माणूस भेटला पाहिजे रे

आधी बंद केले पाहिजे
स्टेट्स ठेवून जगणे रे
भेटून प्रेमाने दोन क्षण
रोज जगता आले पाहिजे रे

माणुसकी संपत चालली
कुठे आपले भान रे
अडकून स्वार्थाच्या जाड्यात 
प्रत्येकाने माणुसकी संपवली रे

अनावश्यक गरजांचा डोंगर
आपणच मोठा केला रे
जगणे होते अतिशय सोपे 
आपणच अवघड केले रे

वेळ आहे अजून ही
आता तरी जागे व्हा रे
जन्म भेटतो एकदा
आता तरी माणुसकीने जगा रे
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला

Sunday, 8 May 2022

आठवण

मतलबी 

सहज कोणी आमची आठवण काढेल
इतके चांगले आम्ही नाही 
पण तुमच्या कामाच्या वेळेस आम्हाला आठवाल
इतके मतलबी आम्ही नाही 

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला