Saturday, 28 May 2022

निरोप

निरोप 

मन आले भरून
काॅलेजचा निरोप घेतांना
आता यशाची नवनवीन शिखरे गाठू
आम्ही जीवन जगतांना

काॅलेजच्या नावाची किर्ती
चौफेर आम्ही गाजवू
घेऊन ज्ञानाचा भंडार
यशाला गवसणी घालू

गुरूंचा आशिर्वाद पाठिशी
मग पाय कसे डगमगतील
येऊ द्या कितीही मोठे संकटे
ईतिहास आमची दख्खल घेईल

गर्व नाही आम्हास
उज्ज्वल भविष्य जबाबदारीने आम्ही घडवू
स्वप्न पाहिलेले भारत देशाचे
साकार आम्ही करू

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

No comments:

Post a Comment