Tuesday, 24 May 2022

माणुसकी

माणुसकी

हा डे तो डे
आता माणूस कंटाळला रे
आता जीवाला जीव देणारा
खरा माणूस भेटला पाहिजे रे

आधी बंद केले पाहिजे
स्टेट्स ठेवून जगणे रे
भेटून प्रेमाने दोन क्षण
रोज जगता आले पाहिजे रे

माणुसकी संपत चालली
कुठे आपले भान रे
अडकून स्वार्थाच्या जाड्यात 
प्रत्येकाने माणुसकी संपवली रे

अनावश्यक गरजांचा डोंगर
आपणच मोठा केला रे
जगणे होते अतिशय सोपे 
आपणच अवघड केले रे

वेळ आहे अजून ही
आता तरी जागे व्हा रे
जन्म भेटतो एकदा
आता तरी माणुसकीने जगा रे
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला

No comments:

Post a Comment