तु करते नोकरी
मी आहे बेरोजगार
तुझ्यावर प्रेम करण्याचा
मला देशील का ग रोजगार
तु ही माझ्यावर प्रेम कराव
अशी इच्छा नाही माझी
फक्त खर्चाला पैसे
देत जा कधी कधी
जमलच तर आपण
लग्न ही घेऊ करून
त्यासाठी मी घेईल न
घरकाम शिकून
तु आॅफिसमधून आली
मी देत जाईल वाढून
सकाळी उठल्यावर बरोबर
गरम चहा ही देत जाईन आणुन
फक्त ज्यावेळेस तुझ्या मैत्रीणी घरी येतील न
तु आधीच मला सांगुन देत जा
आणि माझ्या घरचे येतील न
त्यावेळेस फक्त तु ही थोड सांभाळुन घेत जा
प्रेम तर मी करतोच
पण तु ही थोडस कराव
जर प्रेम नसेल
तर जगुन काय कराव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment