Wednesday, 28 December 2022

खाणाखुणा

खाणाखुणा 

किती खाणाखुणा 
होऊन जातात प्रेमात 
एक भेट नजरेची 
घर करून जाते काळजात 
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Friday, 25 November 2022

अभंग - शेतकरी

शेतकरी

शेतकरी ठार | नेते लोक गार |
नाही तरी हार | बुवारीचे ||

कष्टाची भाकर | लागे त्यास गोड |
पिक येते थोड | दरिद्रीचे ||

किती घ्याल जीव | येते आते कीव |
पिकांना द्या भाव | भडव्याने ||

नाही स्विकारत | हार ठरलेली |
लढतो जिद्दीनी | जगासाठी ||

मुल शिकतील | काळ बदलेल |
शेतकरी राजा | सुखावेल ||
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                        अकोला

Monday, 17 October 2022

मन

मन

तु जवळ नसताना सखे
मन उदास होते
ओढ लागते तुझी
अन डोळ्यात पाणी येते
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Saturday, 15 October 2022

शैली

शैली 
वेगळीच सखे तुझी शैली
मला चोरून पाहण्याची
प्रेमात पाडले मला
आता घे काळची मनाची 
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Thursday, 13 October 2022

नजर

नजर

भिरभिरणारी नजर
सखे तुलाच शोधते
तु दिसत नाही सखे
मन मग रडत बसते
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Sunday, 11 September 2022

दगा

दगा

समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला 
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला

Thursday, 8 September 2022

पैसा

पैसा

पैसा असला की बायको
भेटते भाऊ चांगली
नाही तर भेटते
भाऊ डोंमळी

माणुस कसा ही असो 
काळा, बेवडा, टकला 
पैसा असला की 
तोच असतो सुंदर बाईचा नवरा 

लग्नासाठी नसतो भाऊ 
 तुमचा स्वभाव महत्वाचा
तुमच्याकडे किती संपत्ती
हा प्रश्न महत्त्वाचा

तरच भाऊ लोक 
दाखवतात पोरी
नाही तर राहा भाऊ तुम्ही पडून 
आयुष्यभर घरी
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Wednesday, 10 August 2022

तू

तू

जितकी दूर तू
तितकी जवळ तू 
मनाला मंत्रमुग्ध करणारे
अबोल स्वर तू
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Tuesday, 9 August 2022

हायकू - अच्छे दिन

अच्छे दिन

खूप ऐकले
अच्छे दिन पाहिले
अंधभक्तानी
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                      अकोला

छत्रपती

छत्रपती

 छत्रपतींच्या नावाने राजकारण करायच
आणि छत्रपतींनाच तिकीट नाही द्यायच
आता या कुत्र्यांच्या औलादींना
जनतेने जरा ओळखायला शिकायच

महाराष्ट्राच्या राजकारणात
छत्रपतींच्या नावाने पान सुध्दा नाही हालत
मग छत्रपतींना टिकीट नाही दिल
तेव्हा कुठल्याच पक्षाला लाज कशी नाही वाटत

बंद करा छत्रपतींच्या नावाने राजकारण 
बंद करा भाषणात त्याचा नावाचा वापर 
आणि द्या छत्रपतींच्या वंशजांना आदर
नाही तर त्या कुत्र्यांच्या औलादींनी लक्षात ठेवाव 
त्यांच्या नावाशिवाय तुम्हाला मिळणार नाही साधी भाकर

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                      अकोला

माझा देश

माझा देश 

महागाई वर 
कोणताही मंत्री बोलत नाही 
जनतेला लुबाडतांना
काहीच कस वाटत नाही

आमदार खासदाराचे पगार
कमी होत नाही
देश लुटताना
थोडीशी लाज वाटत नाही

उपाशी जनता मरते
भडवा मन की बात सांगतो
अच्छे दिन येतात
अजून ही स्वप्नच दाखवतो

जनतेचा आक्रोश पाहू नका
रस्ता कमी पडेल धावण्यासाठी
सगळ्या नेत्यांना ठेचून मारले पाहिजे
आपला देश वाचवण्यासाठी

तेव्हा खऱ्या अर्थाने
देशात लोकशाही येईल
तेव्हा माझा देश
प्रजासत्ताक होईल
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                         अकोला

दगा

दगा

तुझ्या वाटा ओल्या झाल्या
माझ्या अश्रूंनी
दिले वचने खोटे झाले 
तुझ्या कृपेनी 

समजावने माझे रोज असते
माझे माझ्या मनाला
कधीच ऐकत नाही काही सुचत नाही
तुझ्या शिवाय या दिलाला

तुझ्या वाटेवर रमतो क्षणभर
सखे तुझी आस लागे जीवाला
अश्रू पुसूण पुन्हा हसून
सखे कसा बसा लागतो मी जगायला

कठीण आहे अवघड नाही
तुझ्या शिवाय जगायला
अरे तुझ प्रेम नाही तू नाही
मग मी देवदास बनायच कशाला

तुझ्या आठवणीचा
ऋणी मी कायम
तू दिला दगा
मी ठेवला सयम

पश्चाताप करून
सखे काय मिळत तूला
लक्षात ठेव मी वह्राड प्रेमाचा
तू दिला दगा
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला


तिरंगा

तिरंगा

हर घर तिरंगा नाही
तिरंगा मना मनात पाहिजे
या बीजेपीच्या खोट्या देशभक्तीला नाही
तर खऱ्या देशभक्तांना पूजल पाहिजे

ज्यांनी स्वातंत्र्य दिले
ते अमर झाले
पण या बीजेपीच्या खोट्या देशभक्तीने तर
लोक उपाशी मेले

गरीब ठार झाला
अंबानी मालामाल झाला
शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाही
हा मोदी हराम झाला

या अंधभक्ताच्या अंधकारातुन
आता हा देश स्वातंत्र्य करायचा आहे
ज्यांनी दिले बलिदान देशासाठी
आता त्यांच्या विचारांचा देश घडवायचा आहे

तेव्हा खऱ्या अर्थाने माझा देश 
सुजलाम सुफलाम होईल
गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य येईल
देशात कुठलाही जाती भेद नसेल
तेव्हा माझा तिरंगा आनंदाने फडकेल
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Wednesday, 3 August 2022

तिरंगा

तिरंगा

हर घर तिरंगा नाही
तिरंगा मना मनात पाहिजे
या बीजेपीच्या खोट्या देशभक्तीला नाही
तर खऱ्या देशभक्तांना पूजल पाहिजे

ज्यांनी स्वातंत्र्य दिले
ते अमर झाले
पण या बीजेपीच्या खोट्या देशभक्तीने तर
लोक उपाशी मेले

गरीब ठार झाला
अंबानी मालामाल झाला
शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाही
हा मोदी हराम झाला

या अंधभक्ताच्या अंधकारातुन
आता हा देश स्वातंत्र्य करायचा आहे
ज्यांनी दिले बलिदान देशासाठी
आता त्यांच्या विचारांचा देश घडवायचा आहे

तेव्हा खऱ्या अर्थाने माझा देश 
सुजलाम सुफलाम होईल
गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य येईल
देशात कुठलाही जाती भेद नसेल
तेव्हा माझा तिरंगा आनंदाने फडकेल
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Saturday, 30 July 2022

मैत्री - हायकू

मैत्री - हायकू

आजची मैत्री
स्वार्थाने भरलेली 
दूर ठेवावी
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                         अकोला

Thursday, 21 July 2022

बाप

बाप

या जगात शब्द नाही
बापावर लिहायला
किती दुःख झेलतो
पण सांगत नाही कोणाला

मारून स्वतःच्या इच्छांना 
दिवस रात्र राबतो
फक्त आपल्या मुलाच्या सुखासाठी
अख्ख आयुष्य पणाला लावतो

कितीही संकटे येऊ द्या
पण पाय त्याचे डगमगतील नाही
मुलाच्या पाठीशी खंबीर उभा
या जगात दुसरा कोणी नाही

नाही कुठली अपेक्षा
मुल उतरत्या वयात वागवेल 
कर्तव्य त्यांचे इतके मोठे
त्या देवालाही लाजवेल

शेवटच्या श्वासापर्यंत  काळजी एकच
फक्त आपल्या मुलाची
तरी पुन्हा नव्याने हसत जन्म घेतो "बाप"
फक्त आपल्या मुलासाठी
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Friday, 15 July 2022

पाषाण

पाषाण 

कोरडे पाषाण तृप्त होऊ दे
असाच धो धो बरसत जा
फुटून प्रेमाला पालवी
माणसाला थोड शिकवत जा
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

उद्धार

मागणे नाही काही
उद्धार तू माझा कर 
प्रेमाच्या या नगरीचा
मला तू राजा कर 
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Thursday, 30 June 2022

तू

तू

धो धो तू बरसावे 
माझ्या प्रेमाच्या ओळीत
प्रेमाचे नवे अंकूर फूटावे
माझ्या प्रत्येक चारोळीत

गंध पसरून व्हावे
अंग अंग रोमांचित
जितकी दूर तू
तितकीच खोल असावी... काळजात

✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                        अकोला

Tuesday, 14 June 2022

सोहळा आनंदाचा

सोहळा आनंदाचा 

सोहळा आनंदाचा
प्रत्येकाने जपू
एक एक क्षण
नव्याने जगू

असतील मतभेद
दूर आपण करू
येऊन सगळ्यांनी एकत्र
प्रेमाचे बीज लावू

नको कोणाचा व्देश
प्रेम आपण वाटू
येणाऱ्या नव्या पिढीला
एक आदर्श ठेवू

माणुसकीची हरितक्रांती
जगात आपण घडवू
सर्व जाती धर्म
सुखाने नांदू
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला 

Friday, 10 June 2022

अभंग - विठ्ठल

पंढरीची आस | लागे जीवा माझ्या |
भक्तीचा सागर | आषाढीचा ||

पाऊले पडती | सुर्य आग ओती |
भक्तीचा गारवा | विठ्ठलाचा ||

नाही आता भान | भक्तांचा सन्मान |
केला तू उद्धार | पंढरीचा || 

वारकरी आम्ही | नित्य येतो दारी |
उभा राहा पाठी | पांडुरंगा ||

भक्त आम्ही दारी| डोळ्यांतूनी पाणी |
उभा विठेवरी | कल्याणाचा ||
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Sunday, 5 June 2022

दादा

तू दादा म्हणून प्रिये
स्पर्धेतून बाद केल मला 
मग स्वप्नात तू येऊन
का?... छेडतेस मला
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

Saturday, 4 June 2022

घाव

घाव

पश्चाताप होईल
ढसढस रडशील 
तू दिलेले घाव
जेव्हा आठवशील
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

इतिहास

इतिहास 

घरा पासून दूर गेल्यावरच
यशाच शिखर गाठता येते
हवी फक्त जिद्द आणि चिकाटी
मग इतिहासही घडवता येते

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

Saturday, 28 May 2022

निरोप

निरोप 

मन आले भरून
काॅलेजचा निरोप घेतांना
आता यशाची नवनवीन शिखरे गाठू
आम्ही जीवन जगतांना

काॅलेजच्या नावाची किर्ती
चौफेर आम्ही गाजवू
घेऊन ज्ञानाचा भंडार
यशाला गवसणी घालू

गुरूंचा आशिर्वाद पाठिशी
मग पाय कसे डगमगतील
येऊ द्या कितीही मोठे संकटे
ईतिहास आमची दख्खल घेईल

गर्व नाही आम्हास
उज्ज्वल भविष्य जबाबदारीने आम्ही घडवू
स्वप्न पाहिलेले भारत देशाचे
साकार आम्ही करू

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

Thursday, 26 May 2022

छत्रपती

छत्रपती

 छत्रपतींच्या नावाने राजकारण करायच
आणि छत्रपतींनाच तिकीट नाही द्यायच
आता या कुत्र्यांच्या औलादींना
जनतेने जरा ओळखायला शिकायच

महाराष्ट्राच्या राजकारणात
छत्रपतींच्या नावाने पान सुध्दा नाही हालत
मग छत्रपतींना टिकीट नाही दिल
तेव्हा कुठल्याच पक्षाला लाज कशी नाही वाटत

बंद करा छत्रपतींच्या नावाने राजकारण 
बंद करा भाषणात त्याचा नावाचा वापर 
आणि द्या छत्रपतींच्या वंशजांना आदर
नाही तर त्या कुत्र्यांच्या औलादींनी लक्षात ठेवाव 
त्यांच्या नावाशिवाय तुम्हाला मिळणार नाही साधी भाकर

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                      अकोला

Tuesday, 24 May 2022

माणुसकी

हा "डे" तो "डे"
आता माणूस कंटाळला रे
आता जीवाला जीव देणारा
खरा माणूस भेटला पाहिजे रे
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                     अकोला

ओळख

स्वतःची ओळख निर्माण करा
जग दख्खल घेईल तुमची
इतरांन सारखे नका जगू
नाहीतर ओळखही नाही राहणार तुमची
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

माणुसकी

माणुसकी

हा डे तो डे
आता माणूस कंटाळला रे
आता जीवाला जीव देणारा
खरा माणूस भेटला पाहिजे रे

आधी बंद केले पाहिजे
स्टेट्स ठेवून जगणे रे
भेटून प्रेमाने दोन क्षण
रोज जगता आले पाहिजे रे

माणुसकी संपत चालली
कुठे आपले भान रे
अडकून स्वार्थाच्या जाड्यात 
प्रत्येकाने माणुसकी संपवली रे

अनावश्यक गरजांचा डोंगर
आपणच मोठा केला रे
जगणे होते अतिशय सोपे 
आपणच अवघड केले रे

वेळ आहे अजून ही
आता तरी जागे व्हा रे
जन्म भेटतो एकदा
आता तरी माणुसकीने जगा रे
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला

Sunday, 8 May 2022

आठवण

मतलबी 

सहज कोणी आमची आठवण काढेल
इतके चांगले आम्ही नाही 
पण तुमच्या कामाच्या वेळेस आम्हाला आठवाल
इतके मतलबी आम्ही नाही 

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

Wednesday, 30 March 2022

अधंभक्त

शपथविधी झाले 
पेट्रोल वाढले 
अधंभक्त म्हणाले 
अच्छे दिन आले 
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                       अकोला

हायकू - बोल

बोल मनाचे
कधी कळावे तुला
बोल साजना
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला

Monday, 28 March 2022

आई

आई वडिलांचे
स्वप्न पूर्ण करण्यात 
जो आनंद आहेन
तो दुसरा कशातच नाही...
 ✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

Saturday, 12 March 2022

गुंतने

गुंतने 

तुझ्यात गुंतून रमायला 
आवडते मला
चार पाच कवितेच्या ओळी
सुचवतात मला
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                        अकोला

हायकू - अच्छे दिन

अच्छे दिन

खूप ऐकले
अच्छे दिन पाहिले
अंधभक्तानी
✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                      अकोला

प्रेम

प्रेम 

तुझ्या आठवणींनी मी सजत गेलो
तुझ्या भासांनी मी वेढत गेलो
प्रत्येक क्षणा क्षणाला सखे 
तुझ्या प्रेमात मी पडत गेलो
✍_______सागर लाहोळकार
                  ८९७५१३९६०४
                      अकोला